लातूर जिल्हा क्रीडा संकुलात तायक्वांदो प्रशिक्षणाला केंद्राची सुरुवात
लातूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। ऑलम्पिक दर्जाच्या खेळ प्रकारातील केंद्र शासन व महाराष्ट्र सरकार मान्यताप्राप्त असलेल्या तायक्वांदो या खेळाच्या लातूर जिल्ह्यातील प्रचार व प्रसारासाठी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड लातूर येथे
खेळाडूंना घेता येणार विविध शासकीय क्रीडा लाभ.


लातूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।

ऑलम्पिक दर्जाच्या खेळ प्रकारातील केंद्र शासन व महाराष्ट्र सरकार मान्यताप्राप्त असलेल्या तायक्वांदो या खेळाच्या लातूर जिल्ह्यातील प्रचार व प्रसारासाठी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड लातूर येथे 10 नोव्हेंबरपासून तायक्वांदो प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात येणार आहे.

खेळाडूंना खेळाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा थेट लाभ घेता येणार असल्याचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर या संघटनेचे सचिव तथा आशियाई तायक्वांदो महासंघाचे प्रशिक्षक मास्टर नेताजी जाधव यांनी सांगितले.

शासन स्तरावर खेळाचे अनेक फायदे असून केंद्र शासन व महाराष्ट्र सरकार यांच्या शासकीय व निमशासकीय नोकरीत खेळाडू कोट्यातून 5 टक्के आरक्षण दिले जाते. याचबरोबर दहावी आणि बारावीच्या शालेय विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत अतिरिक्त गुण, उच्च स्तरावरील पदक प्राप्त खेळाडूंना रोख रकमेचे बक्षिसे, शिष्यवृत्ती, शासकीय स्तरावरील नोकरीत थेट नियुक्ती, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार अशा विविध योजनांचा थेट लाभ मिळवता येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी व त्यांच्या पालकांनी सकाळी 06 ते 09 व पर्यंत व सायंकाळी 04 ते 08 पर्यंत या वेळेत बहुउद्देशीय इमारत जिल्हा क्रीडा संकुल आवसा रोड लातूर येथे भेट द्यावी व खाली दिलेल्या लिंक ला ओपन करून फॉर्म भरावा.

प्रवेश नोंदविण्यासाठी लिंक 👇

https://forms.gle/Yv4SzK7jgt5P17hz9 अशी आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande