टाटा ऑटोकॉम्पची आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी धोरणात्मक भागीदारी
मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.) : ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी कंपोनंट सोल्यूशन्सची अग्रगण्य प्रदाता असलेल्या टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडने प्रगत जागतिक तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी स्कोडा, कॉम्पिन फेनसा आणि एअर इंटरनॅशनल थर्मल सिस्टिम यांसारख्या आंतररा
टाटा ऑटोकॉम्प भागीदारी


टाटा ऑटोकॉम्प भागीदारी


मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.) : ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी कंपोनंट सोल्यूशन्सची अग्रगण्य प्रदाता असलेल्या टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडने प्रगत जागतिक तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी स्कोडा, कॉम्पिन फेनसा आणि एअर इंटरनॅशनल थर्मल सिस्टिम यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. कंपनीची रेल्वे मोबिलिटी क्षेत्रातील ही भागीदारी, तिचे विविधीकरण आणि भारताच्या रेल्वे आधुनिकीकरणाप्रती तिची बांधिलकी दर्शवते. कंपनीचा मुख्य भर स्थानिकीकरणावर आहे!

या प्रसंगी, उप-अध्यक्ष अरविंद गोएल म्हणाले की, ऑटो कंपोनंट्समधील आमच्या सखोल अनुभवामुळे रेल्वे क्षेत्र आमच्यासाठी एक नैसर्गिक विस्तार आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मनोज कोल्हटकर म्हणाले की, कंपनी अनेक दशकांच्या ऑटोमोटिव्ह इंजिनियरिंग अनुभवाचा फायदा घेऊन विश्वसनीय आणि भविष्यासाठी योग्य असे उपाय प्रदान करत आहे. इंटरनेशनल रेलवे इक्विपमेंट एग्ज़िबिशन 2025 मधील हे यशस्वी प्रदर्शन टाटा ऑटोकॉम्पला भारताच्या उदयोन्मुख रेल्वे मोबिलिटी इकोसिस्टममध्ये एक महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून स्थापित करते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande