न्यूमरोस मोटर्सची ‘एन-फर्स्ट’ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच
मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। इलेक्ट्रिक वाहन निर्माता न्यूमरोस मोटर्सने भारतात आपली नवी इलेक्ट्रिक दुचाकी ‘एन-फर्स्ट’ सादर केली आहे. ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर असून, तिची सुरुवातीची किंमत केवळ 64,999 रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे
Numeros Motors launches  N First


मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। इलेक्ट्रिक वाहन निर्माता न्यूमरोस मोटर्सने भारतात आपली नवी इलेक्ट्रिक दुचाकी ‘एन-फर्स्ट’ सादर केली आहे. ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर असून, तिची सुरुवातीची किंमत केवळ 64,999 रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे. ही ऑफर पहिल्या 1,000 ग्राहकांसाठी लागू असून, बुकिंगला सुरुवातही झाली आहे. या स्कूटरचं डिझाइन इटालियन डिझाइन हाऊस ‘Wheelab’ सोबतच्या सहकार्याने तयार करण्यात आलं आहे.

‘एन-फर्स्ट’ स्कूटरचं डिझाइन आकर्षक आणि वेगळं असून, समोरच्या भागात लहान अ‍ॅप्रनमध्ये गोल हेडलॅम्प देण्यात आला आहे. बॉडीवरील तीक्ष्ण रेषा आणि क्रीजेसमुळे स्कूटरला स्पोर्टी लुक मिळतो. मागील भाग साध्या डिझाइनसह दोन-भागी आसनाने सजवला आहे. स्कूटरला 16-इंचांचे मोठे चाके देण्यात आली आहेत, जी या सेगमेंटमध्ये दुर्मिळ आहेत. ‘Traffic Red’ आणि ‘Pure White’ अशा दोन रंगांमध्ये ही स्कूटर उपलब्ध होणार आहे.

ही स्कूटर पाच व्हेरिएंट्स आणि तीन ट्रिम लेव्हल्समध्ये उपलब्ध आहे – n-First Max, n-First i-Max आणि n-First Max+. सर्वाधिक i-Max+ व्हेरिएंटमध्ये 3 kWh बॅटरी दिली असून ती एका चार्जमध्ये 109 किमी पर्यंत चालते. 2.5 kWh क्षमतेच्या Max आणि i-Max व्हेरिएंट्सना लिक्विड इमर्शन-कूल्ड लिथियम-आयन बॅटरी दिल्या आहेत, ज्यामुळे ते 91 किमी पर्यंतचा IDC रेंज देतात.

या स्कूटरला 1.8 kW PMSM मिड-ड्राइव्ह मोटर देण्यात आली आहे, जी चेन ट्रान्समिशनसह कार्य करते. त्यामुळे गाडीला गुळगुळीत वेगवाढ आणि उत्तम ऊर्जा कार्यक्षमता मिळते. 2.5 kWh मॉडेल पूर्ण चार्ज व्हायला 5 ते 6 तास लागतात, तर 3.0 kWh मॉडेलला 7 ते 8 तास लागतात. ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्समुळे स्कूटरची कामगिरी सातत्याने सुधारता येते. या स्कूटरचा कमाल वेग 70 किमी प्रतितास आहे.

सस्पेन्शनसाठी समोर टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे हायड्रॉलिक डॅम्परसह ड्युअल शॉक अ‍ॅब्जॉर्बर्स देण्यात आले आहेत. ब्रेकिंगसाठी पुढे आणि मागे दोन्ही ठिकाणी ड्रम ब्रेक बसवण्यात आले आहेत. स्कूटरची लांबी 1979 मिमी, रुंदी 686 मिमी आणि उंची 1125 मिमी आहे. तिचं व्हीलबेस 1341 मिमी असून ग्राउंड क्लीयरन्स 159 मिमी आहे. अशा आकर्षक डिझाइन, तांत्रिक वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या किंमतीमुळे ‘n-First’ स्कूटर इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात नवा पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande