गूगल पिक्सेल वॉच ४ आता भारतातही उपलब्ध
मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। गूगलची नवी स्मार्टवॉच सिरीज ‘पिक्सेल वॉच ४’ आता भारतात अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पिक्सेल १० सिरीजबरोबर लाँच करण्यात आलेली ही वॉच गूगलच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअर आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येण
Google Pixel Watch 4


Google Pixel Watch 4


मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। गूगलची नवी स्मार्टवॉच सिरीज ‘पिक्सेल वॉच ४’ आता भारतात अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पिक्सेल १० सिरीजबरोबर लाँच करण्यात आलेली ही वॉच गूगलच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअर आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.

पिक्सेल वॉच ४ मध्ये स्नॅपड्रॅगन W5 Gen 2 चिप आणि आर्म कॉर्टेक्स-M55 को-प्रोसेसर देण्यात आला आहे. ही वॉच दोन साइजमध्ये – ४१ मिमी आणि ४५ मिमी – उपलब्ध आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये AMOLED LTPO डिस्प्ले असून DCI-P3 कलर गॅमट, ६०Hz रिफ्रेश रेट आणि ३२०ppi पिक्सेल डेन्सिटी आहे. डिस्प्लेला कस्टम 3D कॉर्निंग गोरिला ग्लास 5 चे संरक्षण देण्यात आले आहे आणि ती ३००० निट्स पीक ब्राइटनेसपर्यंत प्रकाशमान राहते. तसेच, ‘ऑलवेज ऑन डिस्प्ले’ सुविधाही यात आहे.

ही स्मार्टवॉच गूगलच्या Wear OS 6.0 प्लॅटफॉर्मवर चालते आणि यात ३२GB eMMC स्टोरेज व २GB SDRAM आहे. फिटनेस आणि आरोग्य निगराणीच्या दृष्टीने वॉचमध्ये हृदयगती मापन, SpO2 मॉनिटरिंग, झोप आणि तणाव ट्रॅकिंगसह AFib ओळखण्यासाठी ECG अ‍ॅप (निवडक देशांत) दिले आहे. शिवाय त्वचेचे तापमान आणि मासिक पाळीचा चक्र ट्रॅक करण्याची सुविधाही यात आहे. पिक्सेल वॉच ४ मध्ये ५० हून अधिक व्यायाम प्रकारांचा सपोर्ट आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ६.०, वाय-फाय ६, जीपीएस (GPS, Galileo, Glonass, BeiDou, QZSS), NFC आणि अल्ट्रा-वाइडबँड सपोर्ट दिला आहे. ही वॉच Android 11 किंवा त्यापुढील आवृत्त्यांवर चालणाऱ्या स्मार्टफोनशी पिक्सेल वॉच अ‍ॅपद्वारे पेअर करता येते.

किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, ४१ मिमी व्हेरिएंटची किंमत ३९,९०० रुपये असून ती आयरिस, लेमनग्रास, पोर्सिलन आणि ऑब्सिडियन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर ४५ मिमी मॉडेल ४३,९०० रुपयांमध्ये मूनस्टोन, पोर्सिलन आणि ऑब्सिडियन शेड्समध्ये विक्रीसाठी आहे. फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यास अ‍ॅक्सिस बँक डेबिट कार्डधारकांना ५ टक्के (७५० रुपयांपर्यंत) कॅशबॅक ऑफर आहे. नो-कॉस्ट ईएमआयचा ही पर्याय देण्यात आला आहे.

बॅटरीच्या बाबतीत, ४१ मिमी मॉडेलमध्ये ३२५mAh बॅटरी असून ‘ऑलवेज ऑन डिस्प्ले’सह ३० तासांपर्यंत बॅटरी लाईफ मिळते. तर ४५ मिमी मॉडेलमध्ये ४५५mAh बॅटरी असून ती जास्तीत जास्त ४० तासांपर्यंत कार्यक्षम राहते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande