
मुंबई, 11 डिसेंबर, (हिं.स.)। एथर एनर्जी या भारतातील एका आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकाने आज जाहीर केले की, रिझ्टा या त्यांच्या फॅमिली स्कूटरने 2 लाख स्कूटर विक्रीचा टप्पा पार केला आहे. मे 2025 मध्ये 1 लाख रिझ्टा गाड्या विकल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत 2 लाखांचा टप्पा एथरने पार केला आहे. यावरून देशभरात रिझ्टाची दमदार आणि वाढती मागणी दिसून येते.
एप्रिल 2024 मध्ये लॉन्च झाल्यानंतर, रिझ्टाने एथरची पोहोच त्यांच्या दक्षिणेत मजबूत पकड असलेल्या बाजारपेठांच्या पलीकडे नेण्यास मदत केली आहे. आणि नवीन बाजारपेठांनी या फॅमिली स्कूटरला उत्तम प्रतिसाद दिला आहे. 3.7 kWh बॅटरी असलेले टेराकोटा रेड आणि रिझ्टा S हे नवीन व्हेरियन्ट दाखल केल्यानंतर त्यांनी विक्रीत लक्षणीय योगदान देऊन या गतीला आणखी रेटा दिला आहे. एथरचा मध्य भारतातील विस्तार हा मुख्यतः रिझ्टाच्या पाठबळावर झाला आहे. आणि त्यामुळे मध्य भारतातील ग्राहकवर्गाची मागणी पूर्ण करणे एथरला शक्य झाले आहे. एथरच्या एकूण विक्रीत रिझ्टाचे योगदान आता 70% पेक्षा जास्त झाले आहे. शिवाय, एथरने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसारख्या महत्त्वाच्या राज्यांत आपला मार्केट शेअर दुप्पट केला आहे. हा मार्केट शेअर FY26 च्या पहिल्या तिमाहीत 7% होता जो तिसऱ्या तिमाहीत (नोव्हेंबर’25 पर्यंत) 14% वर पोहोचला आहे. याच कालावधीत, पंजाबातील मार्केट शेअर 8% वरून 15% वर आणि उत्तरप्रदेशात 4% वरून 10% वर पोहोचला आहे.
रिझ्टाचे व्यापक स्वागत झाल्यामुळे रिझ्टाने देशभरात एथरची विक्री आणि रिटेल विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वाहन आणि तेलंगणा व्हेइकल ऑनलाइन सेल्स डेटा अनुसार, एथरने अलीकडेच देशभरात 5 लाखांहून जास्त इलेक्ट्रिक स्कूटर्स विकण्याचा मोठा रिटेल टप्पा पार केला आहे. शिवाय, एप्रिल 2024 मध्ये रिझ्टा लॉन्च झाल्यापासून एथरने झपाट्याने आपला विस्तार केला आहे आणि देशात सर्वत्र एक्सपीरियन्स सेंटर्स (ECs) ची संख्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 524 वर पोहोचवली आहे.
प्रस्तुत सिद्धीबद्दल बोलताना एथर एनर्जीचे CBO रवनीत सिंह फोकेला म्हणाले, “रिझ्टाची विक्री सुरुवातीपासूनच धडाक्यात सुरू होती. रिझ्टाने आमची पोहोच वाढवली, एथरचे वितरण आक्रमकतेने वाढवण्यास हातभार लावला विशेषतः मध्य आणि उत्तर भारतात. यापुढे अधिक सखोल वितरणाच्या माध्यमातून आणि सध्याच्या व्यापक बेसचा फायदा करून घेत आमच्या उत्पादनांची सहजप्राप्यता वाढविण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत.”
रिझ्टा दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे- रिझ्टा S आणि रिझ्टा Z या दोन्हीची IDC रेंज अनुक्रमे 123 किमी आणि 159 किमी आहे. रिझ्टाची सीट मोठी आणि आरामदायक आहे. एकंदर स्टोरेज स्पेस 56L आहे, ज्यात 34L इतकी जागा सीटच्या खाली आणि 22L फ्रंक अॅक्सेसरीचा पर्याय आहे. रिझ्टामध्ये प्रशस्त फ्लोअरबोर्ड आहे, जो चालकाला पाय ठेवण्याची ऐसपैस जागा प्रदान करतो. या व्यतिरिक्त, रिझ्टामध्ये स्किडकंट्रोल™ सारखी अनेक सुरक्षा फीचर्स आहेत तसेच पूर्वी एथर 450 सिरीजच्या स्कूटरमध्ये असलेली फॉल सेफ™, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल (ESS) चोरी आणि टो अलर्ट आणि पिंग माय स्कूटर (AtherStack™ प्रो सह उपलब्ध) ही फीचर्स देखील आता रिझ्टामध्ये आहेत. शिवाय, एथर कम्युनिटी डे 2025 रोजी एथरने टचस्क्रीन फंक्शन दाखल करून रिझ्टा Z मध्ये मोठे अपग्रेड जाहीर केले आहे. या वर्षाच्या आरंभी, रिझ्टा नेपाळ आणि श्रीलंका या एथरच्या आंतरराष्ट्रीय बाजारात देखील दाखल करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर