जमीन विक्रीचे आमिष दाखवून महिलेची बार्शीत ११.५७ लाख रुपयांची फसवणूक
सोलापूर, 12 डिसेंबर (हिं.स.)।सुर्डी (ता. बार्शी) येथे माझी जमीन असून मला विक्री करायची आहे त्यापैकी दोन एकर शेती तूम्ही मला टप्प्या टप्प्याने खरेदीचे पैसे द्या सहा महिन्यात खरेदीचा व्यवहार पूर्ण करतो असे सांगून ११ लाख ५७ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्
जमीन विक्रीचे आमिष दाखवून महिलेची बार्शीत ११.५७ लाख रुपयांची फसवणूक


सोलापूर, 12 डिसेंबर (हिं.स.)।सुर्डी (ता. बार्शी) येथे माझी जमीन असून मला विक्री करायची आहे त्यापैकी दोन एकर शेती तूम्ही मला टप्प्या टप्प्याने खरेदीचे पैसे द्या सहा महिन्यात खरेदीचा व्यवहार पूर्ण करतो असे सांगून ११ लाख ५७ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विनोद विठ्ठल जगताप (रा. मुळे प्लॉट, सोलापुर रोड, बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे सुप्रिया गजानन हिरापूरे (रा. सोलापूर रोड, बार्शी) यांनी फिर्याद दाखल केली

फिर्यादीत म्हटले आहे की, कूटुंबात शेती खरेदी करण्याचा विषय चालू होता त्यावेळी विनोद जगताप घरी आला व त्याने सांगितले की, माझ्या हिश्याची सुर्डी येथील गट क्र. उपविभाग ६४ ची १ हेक्टर ६४ आर जमीन माझे नावावर असून त्यापैकी तूम्हाला दोन एकर शेती देतो तूम्ही टप्प्याटप्प्याने खरेदीचे पैसे द्या सहा महिन्यात खरेदीचा व्यवहार पूर्ण करतो दोन एकर शेतीसाठी १२ लाख रुपये व्यवहार ठरला.आतापर्यंत जगताप यास ९ लाख ५७ हजार रुपये रूपये ऑनलाईन पाठविले, दोन लाख रुपये राहते घरी भाऊ सूनील बगले यांचे समक्ष दिले होते. ४ मार्च २०२५ रोजी खरेदी व्यवहार पूर्ण करतो असे म्हटला होता खरेदीसाठी वारंवार फोन केला तर फोन बंद आहे .घरी, नातेवाईकांकडे चौकशी केली असता परिवारासह कूठेतरी निघून गेल्याचे समजले फसवणूक झाल्याचे लक्षात आले पोलिस उपनिरीक्षक अभयकुमार माकणे तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande