रत्नागिरीत रविवारी विधी सेवा सदनाचेउद्घाटन
रत्नागिरी, 12 डिसेंबर, (हिं. स.) : जिल्हा व सत्र न्यायालय येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्र ‘विधी सेवा सदन’ या इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते रविवार, दि. 14 डिसेंबर रोजी
रत्नागिरीत रविवारी विधी सेवा सदनाचेउद्घाटन


रत्नागिरी, 12 डिसेंबर, (हिं. स.) : जिल्हा व सत्र न्यायालय येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्र ‘विधी सेवा सदन’ या इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते रविवार, दि. 14 डिसेंबर रोजी होणार आहे.

सकाळी 9 वाजता जिल्हा न्यायालय परिसरात उद्घाटन समारंभ आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव हे आहेत.या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे यांनी केले आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande