दिव्यांग बांधवासाठी सहकार्याचा हात; टेंभोडेत ट्रायसायकल प्रदान
पालघर, 13 डिसेंबर (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील टेंभोडे गावातील रहिवासी विकास राजेश परमार यांना अपघातात आपला पाय गमवावा लागल्यानंतर जीवनात मोठा संघर्ष उभा राहिला होता. अशा कठीण परिस्थितीत त्यांना पुन्हा स्वावलंबी बनवण्यासाठी सामाजिक जाणिवेतून पुढे
दिव्यांग बांधवासाठी सहकार्याचा हात; टेंभोडेत ट्रायसायकल प्रदान


पालघर, 13 डिसेंबर (हिं.स.)।

पालघर जिल्ह्यातील टेंभोडे गावातील रहिवासी विकास राजेश परमार यांना अपघातात आपला पाय गमवावा लागल्यानंतर जीवनात मोठा संघर्ष उभा राहिला होता. अशा कठीण परिस्थितीत त्यांना पुन्हा स्वावलंबी बनवण्यासाठी सामाजिक जाणिवेतून पुढे येत राहुल प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लायन्स क्लब ऑफ पालघर यांच्या सौजन्याने दिव्यांग ट्रायसायकल प्रदान करण्यात आली.

या ट्रायसायकलमुळे श्री. परमार यांना दैनंदिन कामकाजासाठी मोठा आधार मिळणार असून त्यांच्या जीवनात नव्या आत्मविश्वासाची पेरणी झाली आहे. ही मदत केवळ एक साधन न राहता, त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी देणारी ठरली आहे.

या उपक्रमामुळे गावात सकारात्मक संदेश पोहोचला असून सामाजिक बांधिलकी जपत गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे किती महत्त्वाचे आहे, याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सहकार्याची भावना पोहोचावी, या उद्देशाने करण्यात आलेला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande