
लातूर, 13 डिसेंबर (हिं.स.)।सावधान लातूरकर! रद्द झालेली जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे जमा करण्यासाठी शेवटचे ४ दिवस १६ डिसेंबरपर्यंत मूळ प्रत जमा न केल्यास थेट गुन्हे दाखल होणार;
सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीत चुकीच्या पद्धतीने निर्गमित झालेली जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे शासनाने रद्द केली आहेत. लातूर मनपा क्षेत्रातील अशा १६७७ प्रमाणपत्र धारकांसाठी आता धोक्याची घंटा वाजली आहे. येत्या मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ पर्यंत ही रद्द झालेली मूळ प्रमाणपत्रे जमा करणे अनिवार्य आहे.
महत्त्वाचे काय आहे?
मुदत: १६ डिसेंबर २०२५ (अंतिम तारीख).
काय जमा करायचे: रद्द झालेल्या प्रमाणपत्राची 'मूळ प्रत' (Original). (ज्यांनी फक्त झेरॉक्स दिली आहे, त्यांनाही मूळ प्रत द्यावी लागेल).
कुठे जमा करायचे: तहसील कार्यालय किंवा महानगरपालिका कार्यालय.
कारवाईचा इशारा:
वारंवार सूचना देऊन आणि कर्मचारी घरी येऊनही ज्या नागरिकांनी अद्याप आपली रद्द झालेली प्रमाणपत्रे जमा केलेली नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. कायदेशीर कटकटी टाळण्यासाठी ही तुमची शेवटची संधी आहे.
आवाहन
आपले रद्द झालेले प्रमाणपत्र आजच जमा करा आणि जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis