
अमरावती, 13 डिसेंबर (हिं.स.)।
अमरावती मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने टप्पा टप्प्याने तयारी सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात संपूर्ण प्रभागात निरीक्षकांनी प्रभाग निहाय पदाधिकाऱ्यांचे मत नोंदवून घेतले, दुसऱ्या टप्प्यात इच्छुक उमेदवार अर्ज वितरण दिनांक १० डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२५ असे सतत ३ दिवस सुरू होते.
यामध्ये एकूण ६४१ इच्छुकांनी भाजपा तर्फे इच्छुक उमेदवार म्हणून इच्छा व्यक्त करत अर्ज उचलले आहेत,आता तसऱ्या व महत्त्वपूर्ण टप्प्यात सर्व इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखत होणार असून तसा कार्यक्रम भाजपा तर्फे जाहीर करण्यात आलेला आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक स्वराज्य संस्था भाजपा राज्य निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा निवडणूक प्रभारी संजय कुटे, यांच्या सूचनेनुसार अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष डॉ नितीन धांडे यांच्या अध्यक्षतेमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहे.
शनिवार दिनांक १३ डिसेंबर सकाळी १०.०० वाजता पासून स्थानिक लक्ष्मण स्मृती भाजपा कार्यालय राजापेठ अमरावती येथे मुलाखतीला सुरुवात होणार आहे. तीन दिवस या मुलाखती घेण्यात येणार आहे.
वेळापत्रक खालील प्रमाणे.:-
१) शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ प्रभाग क्रमांक १,२,३,५,६,७,८,९
२) रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५*प्रभाग क्रमांक- १०,११,१२,१३,१४,१७,१८,
३) सोमवार दिनांक १५ डिसेंबर २०२५प्रभाग क्रमांक - १९,२०,२१,२२प्रत्येक प्रभागाला साधारण एक तासाचा वेळ दिलेला आहे, संख्येनुसार थोडा वेळ कमी जास्त होऊ शकतो, मुलाखत दरम्यान कोणत्याही इच्छुकांनी आपले कार्यकर्ते सोबत आणून कोणतेही शक्ती प्रदर्शन नारेबाजी असे प्रकार करू नये,याबाबत काही माहिती व विचारणा करायची असल्यास भाजपा अमरावती शहर जिल्हा महामंत्री बादल कुळकर्णी यांना संपर्क करावा तसेच इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या सर्व सूचनांचे रीतसर पालन करावे असे आव्हान भाजपा अमरावती शहर तर्फे करण्यात आलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी