नांदेडमध्ये मेट्रो ट्रेन प्रणालीचा व्यवहार्यता अभ्यास सुरू होणे अत्यावश्यक - खा. गोपछडे
नांदेड, 13 डिसेंबर, (हिं.स.)। शहरी कार्य मंत्री व विद्युत मंत्री मनोहर लाल यांची भेट घेउन नांदेडसाठी मेट्रोची गरज असल्याचे निवेदन भाजप खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी दिले. या निवेदनात म्हटले आहे की, नांदेड हे मराठवाड्यातील प्रमुख धार्मिक व
नांदेड


नांदेड, 13 डिसेंबर, (हिं.स.)।

शहरी कार्य मंत्री व विद्युत मंत्री मनोहर लाल यांची भेट घेउन नांदेडसाठी मेट्रोची गरज असल्याचे निवेदन भाजप खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी दिले.

या निवेदनात म्हटले आहे की,

नांदेड हे मराठवाड्यातील प्रमुख धार्मिक व ऐतिहासिक शहर. दरवर्षी लाखो भाविक गुरु गोबिंद सिंह जींच्या पवित्र स्थळाला भेट देतात, त्यामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होतो. वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेता आधुनिक, वेगवान आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीची गरज आता अधिक जाणवते. यासाठी नांदेडमध्ये मेट्रो ट्रेन प्रणालीचा व्यवहार्यता अभ्यास सुरू होणे अत्यावश्यक आहे. मेट्रो आल्यास शहरातील कोंडी कमी होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande