
नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)।
- भारतीय जनता पक्षाच्या वतीने नाशिक महानगर पालिकेच्या २०२५-२६ सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवार निवड प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा म्हणून आज १४ ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत सर्व प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. एकूण १२२ प्रभागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असून पक्ष संघटनात्मक मजबुतीसाठी ही मुलाखत प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.
पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, खालील प्रभागांतील उमेदवारांची मुलाखत त्या त्या तारखांना घेतली जाणार आहे.
१४ डिसेंबर-प्रभाग ७,१२,१३,१४, १५ डिसेंबर-प्रभाग १५,१६,२३,३०१६ डिसेंबर-प्रभाग ८,९,१०,११,२४,२५,२६१७ डिसेंबर - प्रभाग २७,२८,,२९,३११८ डिसेंबर - प्रभाग १,२,३,४,५,६१९ डिसेंबर - प्रभाग १७,१८,१९,२०,२१,२२
याप्रमाणे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. पक्षाच्या सूचनेनुसार मुलाखतीला येताना कोणत्याही प्रकारे शक्तिप्रदर्शन करू नये,तसेच मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि भरलेली प्रश्नावली सोबत आणणे अनिवार्य आहे.
तसेच एकाच कुटुंबातील अनेक सदस्य इच्छुक असतील किंवा एखाद्या उमेदवाराने वेगवेगळ्या प्रभागांमध्ये अनेक अर्ज भरले असल्यास, त्यांनी एकदाच निश्चित वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे निर्देश देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे समन्वय व मार्गदर्शन भाजप नाशिक कोअर कमिटी यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.पक्षांतर्गत शिस्त,पारदर्शकता आणि संघटनात्मक निकषांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे असे केदार यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV