
नागपूर, 13 डिसेंबर (हिं.स.)। : इतर मागासवर्ग बहुजन कल्याण संचालनालयाच्या https://dirobbwd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथील मंत्री परिषद सभागृहात झाले.
यावेळी इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सचिव आप्पासाहेब धुळाज यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी संकेतस्थळाविषयी संचालक सोनाली मुळे यांनी माहिती दिली. नागरिकांना या संकेतस्थळावर विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या योजनांची माहिती, अर्ज करण्याची सुविधा आहे तसेच तक्रारींना कृत्रिम बुद्धिमत्तेवर उत्तर देण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे योजनांची माहिती देणारे 'पॉडकास्ट' संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर