बीड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
बीड, 13 डिसेंबर (हिं.स.)। शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्याचे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल टेकाळे, बीड विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश डर
बीड


बीड, 13 डिसेंबर (हिं.स.)। शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्याचे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल टेकाळे, बीड विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश डरफे, किशोर ढाकणे, नागनाथ शिंगण यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाबासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले ज्येष्ठ शिवसैनिक विश्वनाथ खताते यांची याप्रसंगी 'शिवसेना ज्येष्ठ नागरिक कक्षा' च्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी उबाठा गटाचे धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष आणि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्हा बँकेचे संचालक डॉ.संजय कांबळे, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष मालोजी पाटील, रमेश भालेकर, हनुमंत जाधव, अरुण मुंढे व असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, ऍड.ध्वनील गलधर तसेच बीड, धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande