बीड जिल्ह्यात ११ नगरसेवक पदांसाठी ४३ उमेदवार रिंगणात
बीड, 13 डिसेंबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील बीड, परळी, माजलगाव, धारूर, गेवराई आणि अंबाजोगाई नगरपालिकांच्या निवडणुका मतदानाच्या दोन दिवस अगोदर निवडणूक आयोगाने बीड जिल्ह्यातील ११ नगरसेवक पदाच्या निवडणूका पुढे ढकलल्या होत्या. त्यासाठी २० डिसेंबर रोजी म
बीड जिल्ह्यात ११ नगरसेवक पदांसाठी ४३ उमेदवार रिंगणात


बीड, 13 डिसेंबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील बीड, परळी, माजलगाव, धारूर, गेवराई आणि अंबाजोगाई नगरपालिकांच्या निवडणुका मतदानाच्या दोन दिवस अगोदर निवडणूक आयोगाने बीड जिल्ह्यातील ११ नगरसेवक पदाच्या निवडणूका पुढे ढकलल्या होत्या. त्यासाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. एकूण ११ जागेसाठी ४३ उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख पक्षामध्ये थेट लढती होणार असून प्रचारासाठी संपूर्ण पॅनल आणि कार्यकर्ते ताकतीने मैदानात उतरले आहेत.

बीड १, परळी ४, धारूर १ आणि अंबाजोगाई ४ अशा ११ नगरसेवक पदाच्या जागेसाठी ४३ उमेदवार रिंगणात आहेत. ज्या कारणावरून ही निवडणूक पुढे ढकलली त्या पैकी बीड आणि धारूर मध्ये एकानेही माघार घेतली नाही.

अंबाजोगाईत एकाने तर परळीमध्ये ५ जणांनी माघार घेतली.

बीड नगर पालिकेत एकूण ५२ नगरसेवक निवडून येणार आहेत. २ डिसेंबर रोजी ५१ नगर सेवकांसाठी मतदान झाले. २० डिसेंबर रोजी बीड शहरातील वार्ड क्र. ३बची निवडणूक होत आहे. यासाठी ७उ मेदवार निवडणूकीच्या रिंगणात असून ६ हजार ९१७ मतदार आपला नगरसेवक निवडणार आहे.

परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तीन प्रभागातील चार जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग ३ मधील दोन्ही जागा, प्रभाग ९ अ आणि प्रभाग १४ ब या जागांचा यात समावेश आहे. प्रभाग ३ अ मध्ये ४ उमेदवार, ३ब मध्ये ७ उमेदवार, ९ अमध्ये ४ उमेदवार आणि १४ ब मध्ये ४ उमेदवार रिंगणात आहेत.

घारूर नगर पालिकेत १० वार्ड असून एकूण २० नगर सेवक निवडून येणार आहेत. त्यापैकी वार्ड क्र. १० अ ची निवडणूक पुढे ढकलली होती. पूर्वी जेवढे उमेदवार रिंगणात होते तेवढे कायम असून भाजपा-राष्ट्रवादीत फाईट होणार आहे.

बीड ६ हजार ९१७ मतदार निवडणार आपला नगरसेवकनिवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. बीड प्रभाग क्र. ३ ब, अंबाजोगाई प्रभाग क्र. १ ब, ३ अ, ६अ, १०ब, परळी प्रभाग क्र. ३अ, अब, ९अ, ११ ब, १४ ब, धारूर प्रभाग क्र. १० अ या जागेसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे.

अंबाजोगाई येथे १२ उमेदवार, १८ हजार ४७८ मतदार बजावणार हक्क अंबाजोगाई नगर पालिकेच्या चार नगरसेवक पदासाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये वार्ड क्र. १ ब साठी २ उमेदवार मैदानात आहेत. तर ५ हजार १३० मतदार हक्क बजावणार आहेत. वार्ड क्र. ३ अ. साठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. येथे ४ हजार ३८७ मतदार आहेत. वार्ड क्र. ६ अ साठी ३ उमेदवार रिंगणात असून ३५९६ मतदार तर वार्ड क्र. १० ब साठी ५३६५ मतदार हक्क बजावणार असून ४ उमेदवार रिंगणात आहेत.

--------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande