डोंबिवली एमआयडीसीतील रस्ता पुन्हा झाला गुलाबी
डोंबिवली, 13 डिसेंबर (हिं.स.)। औद्योगिक विभागातील प्रदूषणावर जागरूक नागरिक सतत लक्ष ठेवून असल्याने पूर्वीच्याच रस्ता गुलाबी प्रकरणाने एमआयडीसीच्या कारभारावर ताशेरे मारल्याचे दिसून येत आहे. गुलाबी रस्त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
पुन्हा एमआयडीसी गल्लीचा रस्ता झाला गुलाबी


डोंबिवली, 13 डिसेंबर (हिं.स.)।

औद्योगिक विभागातील प्रदूषणावर जागरूक नागरिक सतत लक्ष ठेवून असल्याने पूर्वीच्याच रस्ता गुलाबी प्रकरणाने एमआयडीसीच्या कारभारावर ताशेरे मारल्याचे दिसून येत आहे. गुलाबी रस्त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली एमआयडीसी विभागाची पाहणी करून तेव्हा अधिकारी वर्गाशी चर्चा केली होती. त्यानंतर आता पुन्हा काल शुक्रवारी एमआयडीसीतील तोच रस्ता गुलाबी झाल्याने जोरदार चर्चा सुरु झाली. कारण येथील नवीन नाल्याचे काम सुरू असून जुन्या नाल्याचा गाळ काढण्याचे काम चालू आहे. हा सहा वर्षांपूर्वीचा माती मिश्रितरंग गाळ रस्त्यावर आल्याने रस्त्यावर गुलाबी रंग दिसून येत असल्याची माहिती सांडपाणी रासायनिक प्रक्रिया केंद्र अध्यक्ष डॉ. देवेन सोनी यांनी दिली.

एमआयडीसी फेज -2 मधील एका रस्त्यावर गुलाबी माती पडल्याने शहरात चर्चा सुरु झाली. गुलाबी रस्ता कसा होऊ शकतो याचे कोड सर्वांना पडले होते. याची माहिती मिळताच येथील रस्त्याची सांडपाणी रासायनिक प्रक्रिया केंद्र अध्यक्ष डॉ. देवेन सोनी व उदय वालावलकर यांनी पाहणी केली. दरम्यान रस्तावर असे काहीही दिसून आले नाही असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केल्यानुसार याच रस्त्याच्या एका बाजूला नाल्याजवळ गुलाबी मातीच्या गोणी होत्या. या गोण्या नाल्यात पडल्या होत्या. त्यावेळी हे पाणी रस्त्यावर आले नी रस्ता गुलाबी झाला. आता पाच वर्षानंतर या रस्त्यावर एमआयएमडीसी नवीन नाला बांधकाम करीत असताना जुन्या नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरु होते. या गाळ्यात आधीचा गुलाबी रंगाचा गाळ आल्याने रस्त्यावर त्या गाळातील माती पसरली. त्यामुळे हा रस्ता गुलाबी दिसत आहे असे डॉ. देवेन सोनी यांचे म्हणणे आहे. परंतु डोंबिवली एमआयडीसी भागातील गुलाबी रस्ता पून्हा चर्चेत आला आहे. याबाबत डोंबिवली प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांना संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande