दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक जागीच ठार
जळगाव , 13 डिसेंबर (हिं.स.) अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चोपडा तालुक्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नरेंद्र प्रेमराज पाटील (ता. घुमावल, ता.चोपडा) असे मृताचे नाव आहे.याबाबत असे की, नरें
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक जागीच ठार


जळगाव , 13 डिसेंबर (हिं.स.) अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चोपडा तालुक्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नरेंद्र प्रेमराज पाटील (ता. घुमावल, ता.चोपडा) असे मृताचे नाव आहे.याबाबत असे की, नरेंद्र पाटील हे आपली दुचाकी क्र.एमएच १९ बीए ७९८६ वर अमळनेर येथे पैलाड भागातील राजेंद्र पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला आले होते. सकाळी ११.३० वाजेला तो भेटून चोपडा येथे जाण्यासाठी निघाले असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास अमळनेर येणारी दुचाकी क्रमांक एमएच १९ ईसी २२१३ हिच्याशी समोरासमोर घडक झाल्याने खेन्हीही खाली पडले. यात नरेंद्र पाटील यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर समोरील अज्ञात चालक गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने वाहनात घालून पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना केले. नरेंद्र याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande