
एअर इंडिया एफटीओने टाकले पाऊल
अमरावती, 13 डिसेंबर (हिं.स.)।
अमरावती विमानतळावर एअर इंडिया फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनच्या (एफटीओ) विमानाचे पहिले ऐतिहासिक आगमन शुक्रवार १२ डिसेंबर रोजी यशस्वीरीत्या झाले. दोन आधुनिक डायमंड डिए-४२ मल्टी-इंजिन प्रशिक्षण विमानांचा त्यात समावेश आहे. विदर्भातील विमान प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यासाठीच एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदर्शी नेतृत्व, सातत्यपूर्ण सहकार्य आणि राज्यातील विमानतळ विकासाबाबतच्या ठाम भूमिकेमुळे हे शक्य झाले आहे. विमान वाहतूक पायाभूत सुविधांच्या वेगवान उभारणीत त्यांच्या नेतृत्वाने निर्णायक भूमिका बजावली आहे. तसेच या महत्त्वपूर्ण कार्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एमएडीसीच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी दिलेले प्रभावी मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न अत्यंत मोलाचे ठरले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे अमरावती विमानतळाच्या कार्यक्षमतेत लक्षवेधी प्रगती झाली असल्याचे एअर इंडिया फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनच्या वतीने सांगण्यात आले.
अमरावती विमानतळाच्या विकास प्रवासातील एक परिवर्तनात्मक पाऊल पुढे पडले आहे. ते विमान प्रशिक्षण व विमान वाहतूक क्षेत्राला नवी दिशा देणारे आहे. ही घटना राज्याच्या विमान वाहतूक क्षमतावृद्धीकडे केलेल्या ठोस पावलांचे द्योतक असल्याचे एअर इंडिया फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचे म्हणने आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी