जत तालुका देवभूमी घोषित करण्यावर सरकार सकारात्मक विचार करेल - जयकुमार गोरे
* भाजपा आमदार गोपीनाथ पडळकर यांची मागणी नागपूर, १३ डिसेंबर (हिं.स.) - सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून प्रभू श्रीरामांचा प्रवास, बकासूराचा वध केल्याचा पौराणिक दाखला दिला जातो. जत तालुक्यात मोठ्या देवस्थानांची संख्याही देखील अधिक आहे. ‘देवभूमी’ घो
जत तालुका देवभूमी घोषित करण्यावर सरकार सकारात्मक विचार करेल - जयकुमार गोरे


* भाजपा आमदार गोपीनाथ पडळकर यांची मागणी

नागपूर, १३ डिसेंबर (हिं.स.) - सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून प्रभू श्रीरामांचा प्रवास, बकासूराचा वध केल्याचा पौराणिक दाखला दिला जातो. जत तालुक्यात मोठ्या देवस्थानांची संख्याही देखील अधिक आहे. ‘देवभूमी’ घोषित करणे किंवा अन्य कोणतेही नाव घोषित करणे असे काही आजपर्यंत घडलेले नाही. तशी कायदेशीर व्यवस्था नाही. परंतु आपण ‘जत तालुका देवभूमी’ जाहीर करण्याचा प्रस्ताव दिला आहे त्यावर सरकार सकारात्मक विचार करेल. तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल आणि त्याचा पाठपुरावा करू, असे आश्वासन ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी आश्वासन दिले.

भाजपचे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी ‘जत तालुक्याची भूमी ही रामायण-महाभारत काळापासून ‘मंगल परिसर’ आणि ‘शक्ती पिठांची भूमी’ म्हणून प्रख्यात आहे. तत्वत: त्याला ‘देवभूमी’ म्हणून जाहीर करावे, अशी लक्षवेधी विधानसभेेमध्ये मांडली होती.

मंत्री गोरे म्हणाले, ‘आपल्या मतदारसंघातील ज्या-ज्या मंदिरांच्या विकासासाठीचा प्रस्ताव सादर कराल त्याला शासन मान्यता देईल. गंगम्मादेवीच्या मंदिरासाठी, काळभैरवनाथ देवस्थान बिळूर साठी ५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

बनशंकरी देवस्थान, बनाळी, विठूराया देवस्थान, सोनाळी, एकविरा देवस्थान, रामेश्वर देवस्थान, मुचंडी आणि बेळनसिद्ध देवस्थान यांना ‘ब’ वर्गाचा दर्जा दिलेला आहे.

सन १९९७ पासून २०२३ पर्यंत धार्मिक देवस्थान विकासासाठी केवळ ५५० कोटी रुपये व्यय करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रा स्थळ योजना या माध्यमातून सर्वच देवस्थानांचा विकास करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. सन २०२३ नंतर १ हजार कोटी रुपयांचा व्यय देवस्थान विकासांवर केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande