
छत्रपती संभाजीनगर, 13 डिसेंबर (हिं.स.)। कन्नड येथील पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असलेला म्हाडाच्या मालमत्तांचा प्रश्न अखेर सुटला आहे. म्हाडाने तीनशे मालमत्ता धारकांची यादी भूमी अभिलेख विभागाकडे सादर केली. केंद्र शासनाच्या वतीने कन्नड शहरातील सर्व मालमत्तांचे नगर भूमापन करून मिळकतीचे नकाशे व पत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे.
पंचवीस वर्षांपूर्वी म्हाडाने हा प्रकल्प साकारला होता. मात्र, घरे पालिकेकडे हस्तांतरित न केल्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.मात्र, डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे. म्हाडाने आपल्याकडील तीनशे मालमत्ता धारकांची यादी पालिका व भूमी अभिलेख विभागाकडे सादर केली नव्हती. त्यामुळे प्रकल्पात पेच निर्माण झाला होता. या प्रकल्पात सव्र्व्हे नंबर ३० आणि ३१ वरील मिळकतींचा समावेश आहे. या मिळकतींची नोंद सातबाऱ्यावर म्हाडाच्या नावावर असल्याने रहिवाशांना पीआर कार्ड मिळण्यात अडचणी येत होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis