
जिल्ह्यात १७ पर्यंत सिकलसेल जनजागृती सप्ताह
छत्रपती संभाजीनगर, 13 डिसेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये सिकलसेल तपासणी व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यातील शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या खंडाळा उपकेंद्रात १५ डिसेंबर रोजी सिकलसेल तपासणी शिबिर घेण्यात आले आहे .परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन सिकलसेलची रक्त तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सिकलसेल हा अनुवांशिक रक्तविकार आहे. आई-वडिलांकडून अपत्यामध्ये वर्तुळाकार असतात. सिकलसेल परी मात्र विळ्यासारख्या व ताठर असतात. या पेशी रक्तवाहिन्यांना होतो. सामान्य लाल रक्तपेशी चिकटतात. त्यामुळे अडथळा निर्माण होतो. याला सिकलसेल क्रायसिस म्हणतात. यात तीव्र वेदना होतात. हाडे, फुप्फुस, यकृत, प्लीहा, मेंदू यासारख्या अवयवांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते. हा आजार पूर्णपणे बरा होत मात्र योग्य औषधोपचार, नियमित तपासणी, समतोल आहार आणि काळजी घेतल्यास आजार नियंत्रणात राहतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ लाख ५० हजार लोकांच्या तपासणीचे वार्षिक लक्ष्य आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis