आष्टी–पाटोदा तालुक्यात बिबट्यांची दहशत; स्वतंत्र बचाव केंद्राची मागणी
बीड, 13 डिसेंबर (हिं.स.) | बीड जिल्ह्याातील आष्टी, पाटोदा तालुक्यात २५० पेक्षा अधिक बिबट्यांचे वास्तव आहे. या बिबट्यांच्या हल्ल्याची भिती मतदारसंघातील शेतकरी, नागरीकांमध्ये निर्माण झाले आहे. जनतेला बिबट्यापासून अभय देण्यासाठी सरकारने मतदारसंघात स
आष्टी–पाटोदा तालुक्यात बिबट्यांची दहशत; स्वतंत्र बचाव केंद्राची मागणी


बीड, 13 डिसेंबर (हिं.स.) | बीड जिल्ह्याातील आष्टी, पाटोदा तालुक्यात २५० पेक्षा अधिक बिबट्यांचे वास्तव आहे. या बिबट्यांच्या हल्ल्याची भिती मतदारसंघातील शेतकरी, नागरीकांमध्ये निर्माण झाले आहे. जनतेला बिबट्यापासून अभय देण्यासाठी सरकारने मतदारसंघात स्वतंत्र बचाव केंद्र स्थापन करावे. अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

त्या केंद्राच्या माध्यमातून मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांमध्ये असलेल्या बिबट्यांवर नियंत्रण ठेवावे, शेतकऱ्यांना दिवसा वीजेचा पुरवठा करावा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत केली.

अधिवेशना दरम्यान बिबट्यावरील हल्ल्यांवर उपाय योजने संदर्भात सरकारचे लक्ष वेघताना आमदार धस पुढे म्हणाले की, कोरानाच्या काळात विजय भापकर, गोल्हार यांचा बिबट्याने बळी घेतला. त्यानंतर वाघेरा, गेंगडेवाडी भागातील एका महिलेला बिबट्याने ठार केले

बिबट्या पाळीव प्राण्यांसह कन्य प्राण्यांनाही लक्ष करीत आहे. शुक्रवारी पुन्हा एका बिबट्याने पाटोदा तालुक्यातील थेरला शिवारात हरणाचा फडशा पाडल्याची घटना समोर आली. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आष्टी तालुक्यात एका तरुणाचा बळी तर वडझरी येथील दोन महिलांवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. सध्या आष्टी मतदार संघातील आष्टी, पाटोदा तालुक्यात बिबट्याचे मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. साधरणतः एक बिबट ही तीन पिल्लांना जन्म देते. यामुळे बिबट्याची संख्या झपाट्याने वाढत आहे.

दिवसे-दिवस आढळून येणाऱ्या बिबट्याच्या भितीने शेतकरी, शेतमजूर भयभीत झाले आहेत. या भीतीतून जनतेला भयमुक्त करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीजेचा पुरवठा करावा. त्याच प्रमाणे बचाव केंद्र उभारणी करून बिबट्यांच्या संचारावर नियंत्रण ठेवावे. अशी मागणी त्यांनी केली.

------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande