मराठी पत्रकार परिषदेची विस्तारित कार्यकारिणी बैठक १४ डिसेंबरला देवडी येथे होणार
बीड, 13 डिसेंबर (हिं.स.)। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची विस्तारित कार्यकारिणी बैठक १४ डिसेंबर रोजी देवडी येथे होणार आहे. या वेळी बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान केला जाईल. स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या नावाने दिले जाणारे
मराठी पत्रकार परिषदेची विस्तारित कार्यकारिणी बैठक १४ डिसेंबरला देवडी येथे होणार


बीड, 13 डिसेंबर (हिं.स.)। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची विस्तारित कार्यकारिणी बैठक १४ डिसेंबर रोजी देवडी येथे होणार आहे. या वेळी बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान केला जाईल. स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या नावाने दिले जाणारे विविध पुरस्कारही याच वेळी प्रदान केले जातील.

कार्यक्रम वडवणी तालुक्यातील देवडी येथील माणिक बागेत होणार आहे. सकाळी ११ ते १ या वेळेत पुरस्कार वितरण सोहळा होईल. दुपारी २ वाजता परिषदेची बैठक होणार आहे. या कार्यक्रमाला मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, पद्मश्री पोपटराव पवार, मंगेश चिवटे, पत्रकार विशाल परदेशी, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई आदींची उपस्थिती असणार आहे.

------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande