आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्यामुळे 'एसआरटी'च्या 'मास्टर प्लॅन'ला गती
बीड, 13 डिसेंबर (हिं.स.)। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (एसआरटी) वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या ''मास्टर प्लॅन''ला आता वेग आला आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळ
उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक


बीड, 13 डिसेंबर (हिं.स.)। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (एसआरटी) वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या 'मास्टर प्लॅन'ला आता वेग आला आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे विजयगड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

गेल्या अनेक दिवसांपासून आ. नमिता मुंदडा एसआरटीच्या सक्षमीकरणासाठी आग्रही आहेत. या बैठकीत त्यांनी रुग्णालयाचा भौतिक विस्तार, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार करावयाच्या आराखड्याबाबत अत्यंत महत्त्वाच्या सूचना मांडल्या. अंबाजोगाईकरांना उत्तम आरोग्यसेवा मिळावी, यासाठी त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्टर प्लॅनच्या अंमलबजावणीत गती आणण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन (ऑनलाईन), अधिष्ठाता आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. आ. नमिता मुंदडा यांच्या या प्रयत्नांमुळे लवकरच एसआरटी रुग्णालय सुसज्ज आणि अद्ययावत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande