महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनची निवडणूक बिनविरोध
* सर्वच्या सर्व २२ उमेदवार विजयी नागपूर, १३ डिसेंबर (हिं.स.) : सहकार क्षेत्रात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या व्यवस्थापक समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत सर्व २२ उमेदवार बिनविरोध निवडुन आले आ
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन


* सर्वच्या सर्व २२ उमेदवार विजयी

नागपूर, १३ डिसेंबर (हिं.स.) : सहकार क्षेत्रात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या व्यवस्थापक समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत सर्व २२ उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत. कन्झ्युमर्स फेडरेशनच्या इतिहासातील बिनविरोध होणारी ही पहिलीच निवडणुक ठरली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष व भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती. २०२५-२६ ते २०३०-३५ या कालावधीसाठी ही निवडणूक झाली होती.

मध्यवर्ती ग्राहक भांडारे मुंबई या मतदार संघातून विठ्ठल नाना भोसले, संजय बाबुराव शेटे, अनिल रामचंद्र शिंदे (मुंबई ) हे विजयी झाले आहेत. तर मध्यवर्ती ग्राहक भांडारे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर व अहिल्यानगर मधून प्रमोद पौलस बेलेकर (इचलकरंजी), अरुण सुब्राव कापसे (बार्शी) व किसन बाजीराव पाटील (कराड) हे विजयी झाले आहेत. मध्यवर्ती ग्राहक भांडारे औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर व बीड येथून संदीप जयप्रकाश भंडारी (परभणी), अशोक विश्वनाथराव जगताप व रामेश्वर तुकाराम राव सोनवणे (छत्रपती संभाजीनगर), मध्यवर्ती ग्राहक भांडारे ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव, रायगड, रत्नागिरी व सिधुदुर्ग येथून नारायण गजानन गावंड (कळवा, ठाणे), अनिल बन्सीलाल मुंदडा (धुळे) व संजय माधवराव पाटील (नाशिक), मध्यवर्ती ग्राहक भांडारे नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदियातून अनंतराव मधुकरराव भुईभार (अकोला), विजय शामराव मुळे (वर्धा) व राजेंद्र रामकृष्ण उतखेडे (नागपूर) आणि मध्यवर्ती ग्राहक भांडारे वगळून इतर सर्व सहकारी संस्थामधून पुरुषोत्तम महादेव दळवी (मुंबई ) विजयी झाले आहेत. तर महिला राखीव मतदार संघातून शुभलक्ष्मी विनय कोरे ( वारणानगर, कोल्हापूर) व वैशाली सुमित सावला (मुंबई), अनुसुचित जाती/जमाती राखीव मतदार संघातून अशोक आनंदराव धापोडकर (नागपूर), भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून लाला सिताराम धायगुडे (मुंबई), इतर मागासवर्गीय राखीव मतदार संघातून नितीन बाबुराव हिवसे (अमरावती) हे विजयी झाले आहेत. निवडणूक बिनविरोध पार पाडण्यास पुढाकार घेणारे आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन काळे यांनी हा निकाल जाहीर केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande