आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू कु. गंगा कदम यांना न्याय द्यावा - आ. पाटील
नांदेड, 13 डिसेंबर (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू कु. गंगा संभाजीराव कदम यांना शासकीय नोकरी आर्थिक सहकार्य करावे राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन नांदेड येथील आमदार हेमंत पाटील यांनी मागणी केली हिंगोली जिल्ह्य
नांदेड


नांदेड, 13 डिसेंबर (हिं.स.)।

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू कु. गंगा संभाजीराव कदम यांना शासकीय नोकरी आर्थिक सहकार्य करावे राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन नांदेड येथील आमदार हेमंत पाटील यांनी मागणी केली

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील फुटाणा या छोट्याश्या गावातील कु.गंगा संभाजीराव कदम यांनी आपल्या दिव्यांगत्वा वर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दृष्टिहीन क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दृष्टिहीन महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार पदाची धुरा यशस्वी सांभाळून देशाला श्रीलंका येथे झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विश्वचषक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. कु. गंगा संभाजी कदम या आपल्या भागातील आपल्या मातीतील कन्या असून त्यांच्या कार्याचा गौरव हा सन्मानपूर्वक झाला पाहिजे त्याकरिता राज्य शासनाकडून कु.गंगा कदम यांना शासकीय नौकरीमध्ये सामावून घ्यावे अशी मागणी नागपूर येथे राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन केली.तसेच खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून आर्थिक सहकार्य सुद्धा क्रीडा विभागाकडून करण्यात यावे अशीही मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande