सिल्लोड: ४१३ जन्म प्रमाणपत्रे रद्दचे आदेश, १९२ जणांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर, 13 डिसेंबर (हिं.स.)। सिल्लोड तालुक्यातील १९२ जन्म नोंदणी अर्जातील जन्मस्थळ आणि जन्मतारखेसंदर्भात शैक्षणिक कागदपत्रांचा अभाव असल्याचा ठपका ठेवून उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी ४१३ जणांचे जन्म नोंदणी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आ
Q


छत्रपती संभाजीनगर, 13 डिसेंबर (हिं.स.)। सिल्लोड तालुक्यातील १९२ जन्म नोंदणी अर्जातील जन्मस्थळ आणि जन्मतारखेसंदर्भात शैक्षणिक कागदपत्रांचा अभाव असल्याचा ठपका ठेवून उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी ४१३ जणांचे जन्म नोंदणी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित जन्म-मृत्यू निबंधक यांना या जन्म प्रमाणपत्राची नोंद तत्काळ सीआरएस पोर्टलवरून कमी करून मूळ जन्म प्रमाणपत्र परत घेण्याचे आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात दोषी म्हणून पुन्हा १९२ जणांवर गुन्हा दाखल झाला.

नागरिकांनी प्रलंबित जन्म नोंदणी प्रमाणपत्र सिल्लोड उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने संबंधित ग्रामपंचायत कार्यालय व नगर परिषद कार्यालयातून मागील काळात हस्तगत केले होते.मात्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सिल्लोड महसूल प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारात सदर जन्म नोंदणी अर्जातील जन्माच्या माहिती कागदपत्रासंदर्भात मागितली होती.

या माहितीनुसार २६३४ अर्जाबाबत त्यांनी संशय व्यक्त केला होता. याची सिल्लोड उपविभागीय अधिकाऱ्यांनी दखल घेत उपविभागीय अधिकारी कार्यालयातून वितरित झालेल्या सर्व जन्म प्रमाणपत्राच्या अर्ज संचिकांचीसूक्ष्म तपासणी करून अर्जाच्या संचिकेतील जन्मस्थळ व जन्मतारीख संदर्भात पुरावा दर्शवणाऱ्या पडताळणी आधार कागदपत्रांची केली. या पडताळणीत अनेक नागरिकांनी केवळ कार्डच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र काढले असल्याचे आढळून आले. त्यानुसार आधार कार्डच्या आधारावरील जन्म ४१३ प्रमाणपत्रे रद्द करण्याचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी आदेशित केले. किरीट सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची पुन्हा भेट घेतली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande