नाशिक - उद्यान अधीक्षक भदाणे यांच्या निलंबनासाठी वृक्षप्रेमी आक्रमक
नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)। मल तपोवन परिसरात निस्सारणच्या वाहिन्या टाकण्यासाठी व वनवाटिकेतील झाडांची कत्तल केल्याप्रकरणी वृक्षप्रेमींनी उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांच्या निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तपोवनात मलनिस्सारणच्या वाहिन्या ट
नाशिक - उद्यान अधीक्षक भदाणे यांच्या निलंबनासाठी वृक्षप्रेमी आक्रमक


नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)।

मल तपोवन परिसरात निस्सारणच्या वाहिन्या टाकण्यासाठी व वनवाटिकेतील झाडांची कत्तल केल्याप्रकरणी वृक्षप्रेमींनी उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांच्या निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तपोवनात मलनिस्सारणच्या वाहिन्या टाकण्यासाठी ३०० झाडे तोडून त्या मोबदल्यात फाशीचा डोंगर परिसरात ७००० झाडे लावल्याचा दावा महापालिकेने केला होता. प्रत्यक्षात त्या ठिकाणी चार -पाचशेच रोपे आढळून आली असून, तीही पाणी व चुकीच्या पद्धतीमुळे जळून गेली आहेत. यास उद्यान विभागाचे अधीक्षक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आमरण उपोषण आंदोलन छेडणार आहे. नाशिक शहरातील वृक्षप्रेमींमध्ये संतापाची उसळली आहे. या कत्तलीस उद्यान विभागाचे अधीक्षक विवेक भदाणे हेच कारणीभूत असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांना परत पाठवावे, या मागणीसाठी वृक्षप्रेमींनी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. वृक्षप्रेमी मनोज साठे यांनी त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande