अमेडियाला भरावा लागणार दंडासहित मुद्रांक शुल्क
पुणे, 13 डिसेंबर (हिं.स.)। मुंढवा येथील सरकारी जमीन घोटाळ्या प्रकरणी अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्कात घेतलेली सवलत बेकायदा ठरवत त्यांनी उर्वरित 20 कोटी 99 लाख 99 हजार पाचशे रुपये दंडासह भरावेत, असा आदेश नोंदणी विभागाचे मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष ह
अमेडियाला भरावा लागणार दंडासहित मुद्रांक शुल्क


पुणे, 13 डिसेंबर (हिं.स.)। मुंढवा येथील सरकारी जमीन घोटाळ्या प्रकरणी अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्कात घेतलेली सवलत बेकायदा ठरवत त्यांनी उर्वरित 20 कोटी 99 लाख 99 हजार पाचशे रुपये दंडासह भरावेत, असा आदेश नोंदणी विभागाचे मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिला.या आदेशामुळे ‌’अमेडिया‌’ला आता उर्वरित मुद्रांक शुल्काबरोबरच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 39 नुसार थकित रकमेवर दरमहा एक टक्का दराने दंड म्हणून 1 कोटी 47 लाख रुपये भरावे लागणार आहेत. तसेच हे शुल्क भरण्यास विलंब झाल्यास दंडाच्या या रकमेत दरमहा एक टक्का वाढ होत जाणार आहे, असेही त्यांनी या आदेशात स्पष्ट केले.मुद्रांक शुल्काच्या सवलतीसाठी अमेडिया कंपनीने उद्योग खात्याकडून इरादा पत्र मिळविले असले तरी, तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले जिल्हा उद्योग केंद्राचे ना हरकत प्रमाणपत्र त्यासोबत जोडलेले नव्हते. त्यामुळे ही सवलत बेकायदेशीर असल्याचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande