पुण्यात भाजपचा 80/20 फॉर्म्युला, प्रवेश फक्त जिथे गरज!
पुणे, 13 डिसेंबर (हिं.स.)। भाजपमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली होती. तब्बल अडीच हजारांहून अधिक इच्छुकांनी अर्ज घेऊन ते भरून जमा करायला सुरूवात केली आहे. अर्ज स्वीकृतीसोबतच भाजपने इच्छुक उमेदवारांचा प्रभागनिहाय सर्व्हे प्रक्रिया स
पुण्यात भाजपचा 80/20 फॉर्म्युला, प्रवेश फक्त जिथे गरज!


पुणे, 13 डिसेंबर (हिं.स.)।

भाजपमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली होती. तब्बल अडीच हजारांहून अधिक इच्छुकांनी अर्ज घेऊन ते भरून जमा करायला सुरूवात केली आहे. अर्ज स्वीकृतीसोबतच भाजपने इच्छुक उमेदवारांचा प्रभागनिहाय सर्व्हे प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारात जिंकण्याची क्षमता असेल तसेच स्थानिक नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? याचा अभ्यास करून तिकिटांचे गणित निश्चित होणार आहे. विरोधी गटातील अनेक इच्छुक देखील भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी देखील अर्ज नेल्याची माहिती आहे. तर शिंदे सेनेतील एका माजी मंत्र्यांच्या मुलाने देखील अर्ज नेल्याची माहिती आहे. 80 टक्के पक्षातील तर 20 टक्के बाहेरील इच्छुकांना संधी देण्याचा फॉर्म्युला भाजपने ठरवला असून, येत्या आठवड्यात पक्षाबाहेरील इच्छुकांचा प्रवेश होत असल्याची माहिती आहे.आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग दिला असून, शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रभागनिहाय पदाधिकारी बैठकींची मालिका सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक एक ते आठच्या बैठका पार पडल्या. पुढील चार दिवसात उर्वरित प्रभागाच्या बैठका होणार आहेत. या बैठकींच्या माध्यमातून प्रभागस्तरावरील राजकीय व संघटनात्मक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande