
सोलापूर, 13 डिसेंबर, (हिं.स.)।सोलापूर शहराजवळील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या समोर गुरुवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरीही एकही सहकारी साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केलेला नाही. या कारणावरुन शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 38 साखर कारखाने असूनही शेतकऱ्यांना आपले हक्क मिळत नसल्याची तक्रार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली पाहायला मिळत आहे.उसाची पहिली उचल ३,४०० रुपये जाहीर करावी, अशी मागणी करत शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन कारखान्याच्या गेटवर आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की, सोलापूरच्या मतदारसंघातील खासदार प्रणिती शिंदें यांनी केंद्रीय संसदेत एक शब्दही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उचलला नाही. ही खूप मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड