
सोलापूर, 13 डिसेंबर (हिं.स.)
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२५ दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचेकडील प्राप्त निर्देशानुसार मतदाना दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन मतदान प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
सार्वत्रिक नगरपरिषद , नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या जाहीर कार्यक्रमानुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मतदान २० डिसेंबर २०२५ व मतमोजनी २१ डिसेंबर २०२५ रोजी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे यास अनुसरुन सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मतदाना दिवशी वार शनिवार २० डिसेंबर २०२५ व मतमोजनी दिवशी वार रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी नमुद नगरपरिषद / नगरपंचायत हद्दीतील आठवडा बाजार भरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये बार्शी येथील आठवडा बाजार शनिवारी तसेच सांगोला व मोहोळ येथील आठवडा बाजार रविवारी भरविण्यात येतो.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम ३७(३) व दि. मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट १८६२ मधील कलम ५ (ग) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी सोलापूर यांनी आदेश दिले आहेत की, सार्वत्रिक नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक- २०२५ च्या अनुषंगाने मतदान केंद्राच्या परिसरात सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी खालील नगरपरिषद / नगरपंचायत हद्दीतील आठवडा बाजार २० डिसेंबर २०२५ व मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी असल्याने सदर आठवडा बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड