सोलापूर - मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्र परिसरात कलम १६३ लागू
सोलापूर, 13 डिसेंबर (हिं.स.) मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायर्तीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२५ नुसार ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल
सोलापूर - मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्र परिसरात कलम १६३ लागू


सोलापूर, 13 डिसेंबर (हिं.स.)

मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायर्तीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२५ नुसार ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्याअनुषंगाने नगरपरिषद , नगरपंचायतींचे २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुक २०२५ ची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पारपाडण्याच्या दृष्टीकोनातुन सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात २० डिसेंबर २०२५ रोजी होणा-या मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी मतदारांव्यतिरिक्त मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघामध्ये प्रवेश करण्यास निर्बंध घालणे आवश्यक आहे. आणि सर्व संबंधीतांना नोटीस देवुन त्यांचे म्हणणे ऐकुन घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ नुसार एकतर्फी आदेश काढणे आवश्यक आहे.

जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहित्ता-२०२३ चे कलम १६३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन नगरपरिषद, नगरपंचायती निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन सोलापूर ग्रामीण जिल्हयात सर्व नगरपरिषद, नगरपंचायती मतदार संघातील दि.२० डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतदान केंद्रावर होणाऱ्या सकाळी ०६.०० ते मतदान संपेपर्यंतच्या कालावधीकरिता सर्व मतदान केंद्राचे ठिकाणापासून १०० मीटर परिसरातील सर्व वाणिज्यीक आस्थापना, सर्व मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, चिन्हांचे प्रदर्शन करण्यास निवडणुक प्रक्रियेत भाग घेणारे शासकीय व्यक्ती व त्यांचे वाहनांव्यतीरिक्त इतर व्यक्तीस अथवा खाजगी वाहन प्रवेश करण्यास याव्दारे प्रतिबंध करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande