पुणे, 13 डिसेंबर (हिं.स.)।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर होणाऱ्या मॅरेथॉनसाठी धावपटूंना सुरक्षित प्रवेश मिळावा, यासाठी आयोजकांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मॅरेथॉनच्या दिवशी रविवारी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये वाहनांना बंदी राहणार आहे. पायी किंवा रेस-डे शटल बसद्वारे कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे.

---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु