सासवड उपबाजारात ज्वारीला तब्बल 4 हजारांचा दर!
पुणे, 13 डिसेंबर (हिं.स.)। पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उपबाजारात धान्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 4 हजार रुपयांचा दर मिळाल्याची माहिती निरा कृषी उत्पन्न बाजार सम
सासवड उपबाजारात ज्वारीला तब्बल 4 हजारांचा दर!


पुणे, 13 डिसेंबर (हिं.स.)।

पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उपबाजारात धान्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 4 हजार रुपयांचा दर मिळाल्याची माहिती निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली.सासवड उपबाजारात वाल्हा, राजुरी, वाघापूर, माळशिरस, गराडे, परिंचे, वीर, दिवे यासह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते.

सासवड उपबाजारात एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4 हजार रुपये, तर दोन नंबर प्रतिच्या ज्वारीला किमान 2 हजार 500 हजार रुपये, तर सरासरी 3 हजार 250 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, असे निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande