
सोलापूर, 13 डिसेंबर (हिं.स.)।
अवैध वाळू तस्करीमुळे दोन-तीन गावे ॲक्शन मोडवर असून आम्ही वाळू उपसा करतो याची नावे पोलिसांना का सांगतो यावरून अकोले-खुर्द येथील ॲड पांडुरंग कुबेर तोडकर यांना वाळू तस्कराकडून झालेल्या निर्घृण मारहाणीच्या घटनेचा ग्रामस्थांच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच वाळू उपसा बंदीचा विशेष ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे.
अकोले-खुर्द येथील ॲड पांडुरंग कुबेर तोडकर यांना वाळू व्यवसाय करणाऱ्याकडून लोखंडी अँगल, लाकडी दांडके, दगड याने अत्यंत निर्घृणपणे मारहाण करण्यात आली होती.या मारहाणीत ॲड पांडुरंग कुबेर यांचे पाय व हात चार ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. या निर्घृण मारहाणीचे तीव्र पडसाद परिसरातील गावातून उमटले होते.या घटनेच्या अनुषंगाने माढा येथील माढा बार असोशिएनच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला.तसेच माढा न्यायालयात माढा बार असोसिएशनच्या वतीने दोन दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले होते. पंढरपूर न्यायालयात ही काम बंद आंदोलन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड