मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी ते जून २०२६ शिबिर दौरा जाहीर
रायगड, 14 डिसेंबर (हिं.स.)। उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जानेवारी ते माहे जून २०२६ या कालावधीतील शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दौरा कार्यक्रमामुळे रायगड जिल्ह्याती
मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी ते जून २०२६ शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर


रायगड, 14 डिसेंबर (हिं.स.)। उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या मोटार वाहन निरीक्षकांचा माहे जानेवारी ते माहे जून २०२६ या कालावधीतील शिबिर दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या दौरा कार्यक्रमामुळे रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील नागरिकांना वाहन नोंदणी, तपासणी, परवाना, वाहन हस्तांतरण तसेच अन्य परिवहन विषयक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होणार आहे.

जानेवारी २०२६ महिन्यात बुधवार, दि. १४ रोजी रोहा, मंगळवार, दि. १३ रोजी मुरुड, शुक्रवार, दि. ९ आणि शुक्रवार, दि. २३ रोजी अलिबाग येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोमवार, दि. १२ आणि मंगळवार, दि. २७ रोजी महाड, बुधवार, दि. २८ रोजी श्रीवर्धन आणि गुरुवार, दि. २९ जानेवारी रोजी माणगाव येथे शिबिर होणार आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये बुधवार, दि. १८ रोजी रोहा, मंगळवार, दि. १७ रोजी मुरुड, शुक्रवार, दि. १३ आणि शुक्रवार, दि. २७ रोजी अलिबाग येथे शिबिरे होणार आहेत. महाड तालुक्यात सोमवार, दि. १६ आणि सोमवार, दि. २३ रोजी, तर मंगळवार, दि. २४ रोजी श्रीवर्धन आणि बुधवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी माणगाव येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

मार्च २०२६ महिन्यात बुधवार, दि. १८ रोजी रोहा, मंगळवार, दि. १७ रोजी मुरुड, शुक्रवार, दि. १३ आणि सोमवार, दि. ३० रोजी अलिबाग येथे शिबिरे होतील. महाड येथे सोमवार, दि. १६ आणि सोमवार, दि. २३, मंगळवार, दि. २४ रोजी श्रीवर्धन आणि बुधवार, दि. २५ मार्च रोजी माणगाव येथे शिबिर होणार आहे.

एप्रिल २०२६ मध्ये बुधवार, दि. २२ रोजी रोहा, मंगळवार, दि. २१ रोजी मुरुड, शुक्रवार, दि. १० आणि शुक्रवार, दि. २४ रोजी अलिबाग, सोमवार, दि. २० आणि सोमवार, दि. २७ रोजी महाड, मंगळवार, दि. २८ रोजी श्रीवर्धन आणि बुधवार, दि. २९ एप्रिल रोजी माणगाव येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

मे २०२६ मध्ये बुधवार, दि. १३ रोजी रोहा, मंगळवार, दि. १२ रोजी मुरुड, शुक्रवार, दि. ८ आणि शुक्रवार, दि. २२ रोजी अलिबाग, सोमवार, दि. ११ आणि सोमवार, दि. १८ रोजी महाड, मंगळवार, दि. १९ रोजी श्रीवर्धन आणि बुधवार, दि. २० मे रोजी माणगाव येथे शिबिर होणार आहे.

जून २०२६ महिन्यात बुधवार, दि. १७ रोजी रोहा, मंगळवार, दि. १६ रोजी मुरुड, शुक्रवार, दि. १२ आणि शुक्रवार, दि. १९ रोजी अलिबाग, सोमवार, दि. १५ आणि सोमवार, दि. २२ रोजी महाड, मंगळवार, दि. २३ रोजी श्रीवर्धन आणि बुधवार, दि. २४ जून रोजी माणगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande