
नांदेड, 15 डिसेंबर (हिं.स.)। भोकर शहरातील किनवट रोडवरील एका हार्डवेअर समोर जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील मयत आणि आरोपीचे किनवट रोडवरील गंदेवार हार्डवेअर समोरील झोपडीजवळ जोरदार भांडण झाले.
आरोपीने रागाच्या भरात जिवे मारण्याच्या उद्देशाने आरोपीने डोक्यावर, डोळ्यावर व पाठीवर लाकडाने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमीला उपचारासाठी शासकीय रुग्णालय नांदेड येथे हलवण्यात आले मात्र ,नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.याबाबत मयताचा भाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलिसांत गुरन ५९२/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ११८ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित कुंभार हे करत असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे भोकर शहरात एकच खळबळ उडाली आहे .
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis