देवपूर पोलिसांनी लावला घरफोडीचा छडा
धुळे , 13 डिसेंबर (हिं.स.) देवपुर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. या चोरीतील ३२ हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून संशयतांना ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत मुर
देवपूर पोलिसांनी लावला घरफोडीचा छडा


धुळे , 13 डिसेंबर (हिं.स.) देवपुर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. या चोरीतील ३२ हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून संशयतांना ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत मुरलीधर बोरकर वय ५० वर्षे रा. प्लॉट नं. ११४ प्रभातनगर, देवपुर, धुळे यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे त्यांचे मामा प्रमोद ज्ञानेश्वर धरणगावकर रा. प्लॉट नं. ११६ व. प्रभात नगर, देवपुर, धुळे हे वयोवृध्द असल्याने मागील एका वर्षापासुन त्यांचे मुलाकडे पुणे येथे राहतात. दरम्यान, बोरकर हे मी त्यांच्याघराकडे लक्षदेत होते. यामुळे ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रमोद धरणगावकर यांचे घरी जाताना त्यांच्या घराच्या पुढील बाजुस मिरची कांडपचे दुकानाचा लोखंडी दरवाजा वेल्डीग करुन कायमचा बंद केलेला होता. हा तो दरवाजा तुटलेला दिसला म्हणुन बोरकर यांनी अलगद दरवाजा लोटून मध्ये डोकावुन पाहिले असता घरातील पाच हजार ५००० रुपये किंमतीचे एल. जी. कंपनीचे वॉशिंग मशीन, दहा हजाराचे एल. जी. कंपनीचे डबल डोअर फ्रिज, दहा हजाराचा ६० किलोचा वजन काटा, पाच हजाराचे स्टिलचे पिंपाचे मिक्सर,दोन हजाराचे एच.पी. गॅस कंपनीचे सिलेंडर असा एकुण ३२ हजार रुपये किंमतीचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने लांबवीला. याप्रकरणी देवपुर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक, समाधान वाघ व शोध पथकाचे अंमलदार यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुन्हे शोध पथकाला सुचना दिल्या. गुन्हे शोध पथकानेअवघ्या तीन दिवसाच्या आत चोरटयांचा शोध घेऊन अरबाज ऊर्फ माया शेख (वय २२ वर्षे) रा.गुलाबहाजी नगर, देवपुर, धुळे, फरदीनखान ऊर्फ रति फिरोजखान (वय २० वर्षे) रा. जाणताराजा चौक, विटा भट्टी, देवपुर, धुळे व उयेदअली ऊर्फ गोल्या अश्रफअली, (वय २३ वर्षे) रा. सुशिनाला विटाभट्टी, देवपुर, धुळे यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनीहा गुन्हा केल्याची कबुली दिली.चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधीकारी राजकुमार उपासे, धुळे शहर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश आघाव, शोध पथकातील अंमलदार मिलिंद सोनवणे, किरण मेहरुणकर,कैलास पाटील,राजेंद्र हिवरकर, भटेंद्र पाटील, प्रविण पाटील, राहुल गुजांळ, सौरभ कुटे, शुभम बोरसे, चालक मनोहर भामरे तसेच चापोहवा योगेश महाजन यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande