
नाशिक, 17 डिसेंबर (हिं.स.)।
- नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने (आप) कडून नगर-सेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुल-ाखतींना सुरुवात करण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, त्या अनुषंगाने सक्षम, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी उमेदवार निवड प्रक्रिया राबवली जात आहे. मुलाख-ती मध्यवर्ती आम आदमी पार्टी कार्यालय, नाशिक येथे सुरू असून या प्रक्रियेला इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी उमेदवारी अर्ज भरून मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतींना नाशिक जिल्हाध्यक्ष उत्तमराव निरभवणे, शहराध्यक्ष अमोल लांडगे आणि नाशिक संघटक अनिल कौशिक यांची प्रमुख उपस्थिती आहे. नाशिकच्या विकासासाठी प्रामाणिक, कार्यक्षम आणि जनतेशी थेट जोडलेले प्रतिनिधी महापालिकेत पाठवण्याचा पक्षाचा उद्देश असल्याचे 'आप'कडून स्पष्ट करण्यात आले आहे. पारदर्शक प्रशासन, मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारे उमेदवार देण्याचा पक्षाचा संकल्प आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV