तपोवनात वृक्ष तोडीवर 7 जानेवारीला सुनावणी
राज्य सरकारसह पालिकेला हजर राहण्याचे आदेश नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.) : नाशिकच्या तपोवनातील साधुग्रामधील प्रस्तावित वृक्षतोडीला स्थगिती द्यावी. याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष ॲड नितीन पंडित यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
तपोवनात वृक्ष तोडीवर 7 जानेवारीला सुनावणी


राज्य सरकारसह पालिकेला हजर राहण्याचे आदेश

नाशिक, 18 डिसेंबर (हिं.स.) : नाशिकच्या तपोवनातील साधुग्रामधील प्रस्तावित वृक्षतोडीला स्थगिती द्यावी. याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष ॲड नितीन पंडित यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. दरम्यान या याचिकेवर गुरुवारी (दि.18) सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाने 7 जानेवारी रोजी याप्रकरणाची सुनावणी ठेवली असून सदर सुनावणीसाठी राज्य शासन व महापालिका प्रशासनाला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे याचिकाकर्ते ॲड पंडीत यांनी म्हटले आहे.

....

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande