अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची प्रारुप यादी प्रसिद्ध
अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.) भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक विधानपरिषद मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार, दि. 3 डिसेंबर 2025 रोजी शिक्षक मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आ
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची प्रारुप यादी प्रसिद्ध


अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.) भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक विधानपरिषद मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार, दि. 3 डिसेंबर 2025 रोजी शिक्षक मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदारांना आता घरबसल्या आपले नाव ऑनलाइन शोधता येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालय आणि विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दि 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन नाव शोधण्यासाठी अधिकृत लिंक शिक्षक मतदारांच्या सुविधेसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी संकेतस्थळ https://ceoelection.maharashtra.gov.in/ConstituencyRolls/TandGElectoralRollsSimple.aspx

उपलब्ध करून दिले आहे. अमरावती विभागातील सर्व पात्र शिक्षकांनी या प्रारुप यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करावी. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन उप-जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande