गडचिरोली - आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त 18 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रम
गडचिरोली., 17 डिसेंबर (हिं.स.)संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत जाहीरनामा स्वीकारला असून, त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन म
गडचिरोली - आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त 18 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रम


गडचिरोली., 17 डिसेंबर (हिं.स.)संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत जाहीरनामा स्वीकारला असून, त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या निर्देशानुसार यावर्षीही गडचिरोली जिल्ह्यात जिल्हास्तरावर अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने बुधवार, दि.18 डिसेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा हे असणार आहेत.

कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची माहिती देण्यात येणार असून, शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, संरक्षणात्मक तरतुदी तसेच समान संधी व सामाजिक समावेशनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांमध्ये हक्कांविषयी जागृती निर्माण करणे, सामाजिक सलोखा वाढवणे व समतेच्या मूल्यांना बळकटी देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये भित्तीपत्रक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्याने, चर्चासत्रे व परिसंवाद अशा विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अल्पसंख्याक हक्कांविषयी संवेदनशीलता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय कार्यक्रमास तसेच इतर जनजागृती उपक्रमांना अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने तसेच जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande