गडचिरोली : धान विक्रीसाठी 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढवली
गडचिरोली, 17 डिसेंबर (हिं.स.) | आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये धान/भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणी करीता शासनाने 15 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिलेली होती. परंतू शेतक-यांच्या नोंदणीची आकडेवारी लक्षात घेता शासनाने सदर मुदतव
गडचिरोली : धान विक्रीसाठी 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढवली


गडचिरोली, 17 डिसेंबर (हिं.स.) | आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये धान/भरडधान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणी करीता शासनाने 15 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिलेली होती. परंतू शेतक-यांच्या नोंदणीची आकडेवारी लक्षात घेता शासनाने सदर मुदतवाढ दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून दिलेली आहे.

त्यानुसार दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन मर्या, जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या बिगर आदिवासी क्षेत्रातील शेतक-यांना विनंती करण्यात येते की, शासनाने दिलेल्या दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या मुदतीत आपल्या आपल्या गावाला जोडलेल्या धान खरेदी केंद्रावर जावून धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, गडचिरोली मार्फत करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande