नाशिक मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती संपन्न
नाशिक, 17 डिसेंबर (हिं.स.)। - राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बुधवार, दि.१७ डिसेंबर रोजी नाशिक येथे भुजबळ फार्म कार्यालयात महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुल
मनपा निवडणुकीसाठी राकपाच्या इच्छुकाच्या मुलाखती माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न


नाशिक, 17 डिसेंबर (हिं.स.)।

- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बुधवार, दि.१७ डिसेंबर रोजी नाशिक येथे भुजबळ फार्म कार्यालयात महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आल्या .

राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने महानगरपलिका निवडणुकींचा प्रोग्राम जाहीर केला आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत आपला झेंडा रोवण्यास सज्ज झाली आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीकडे इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नाशिक शहर यांच्या वतीने या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ ते ३१ मधील सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आज बुधवारी आयोजन करण्यात आले होते या मुलाखती माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्या आहेत. या महत्त्वपूर्ण मुलाखतींना नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थिती होते.

पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आणि सक्षम, कार्यक्षम उमेदवारांची निवड करण्यासाठी या मुलाखती अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. यामध्ये प्रभागनिहाय स्थानिक प्रश्न, पक्षनिष्ठा, सामाजिक कार्य, संघटनात्मक अनुभव तसेच आगामी निवडणुकीसाठीची तयारी या बाबींचा सखोल आढावा या मुलाखतीदरम्यान घेतला गेला

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande