सोलापूर - नगरपालिका निवडणुकीत विरोधी पक्षाचा पाठिंबा ?
सोलापूर, 17 डिसेंबर, (हिं.स.) - मंगळवेढा शहराच्या विकासासाठी आम्ही कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊ शकतो येत्या काही दिवसात आम्हाला इतर विरोधी पक्ष देखील पाठिंबा देण्यास तयार आहेत आणि देतील अशी गुगली आ.समाधान आवताडे यांनी टाकली. त्यामुळे कोणता विरोधी
सोलापूर - नगरपालिका निवडणुकीत विरोधी पक्षाचा पाठिंबा ?


सोलापूर, 17 डिसेंबर, (हिं.स.) - मंगळवेढा शहराच्या विकासासाठी आम्ही कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊ शकतो येत्या काही दिवसात आम्हाला इतर विरोधी पक्ष देखील पाठिंबा देण्यास तयार आहेत आणि देतील अशी गुगली आ.समाधान आवताडे यांनी टाकली. त्यामुळे कोणता विरोधी पक्ष पाठिंबा देतो याची शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. पण आमदार अवताडे यांनी टाकलेल्या गुगलीमुळे शहरातील राजकीय वातावरण ऐन थंडीत गरम झाले. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांनी आज शहरात पदयात्रा काढली.

पदयात्रेच्या समारोपानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुप्रिया जगताप, अजित जगताप, बशीर बागवान, गौरीशंकर बुरकुल, संभाजी घुले, महादेव जाधव, पांडुरंग नाईकवाडी, प्रवीण खवतोडे, बबलू सुतार, आदी उपस्थित होते त्यावेळी बोलताना आ. अवताडे म्हणाले की, जनतेला विकास हवा आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. तसा निधी त्यांनी मंगळवेढासाठी यापूर्वी दिला आहे हे मतदारांच्या लक्षात आल्यामुळे मतदार आमच्या पाठीशी आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande