
अकोला, 17 डिसेंबर (हिं.स.)।
अकोला बसस्थानकावर चोरीचा प्रयत्न खदान पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेत उधळून लावण्यात आला. वाशिम येथील अमीता राठोड या नाशिकहून आपल्या गावी परतत असताना अकोला बसस्थानकावर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बॅगमधील पर्स चोरली. सदर पर्समध्ये साडेसात ग्रॅम सोन्याची चैन व काही रोकड होती.
घटनेची माहिती मिळताच संबंधित एसटी बस खदान पोलीस ठाण्यासमोर थांबवण्यात आली. खदान पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बसची झाडाझडती घेतली. तपासादरम्यान चोरीस गेलेली पर्स आणि त्यातील मौल्यवान ऐवज पोलिसांना सापडला. त्यामुळे प्रवाशाचे नुकसान टळले. ऐवज सुरक्षितपणे परत मिळाल्याने अमीता राठोड यांनी खदान पोलिसांचे मनापासून आभार मानले आहे. मात्र चोरट्याने एसटी बसची तपासणी सुरू असल्याचा पाहता येथून पळ काढला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे