
अकोला, 17 डिसेंबर (हिं.स.)।
अकोला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून 7 फेब्रुवारी 2024 रोजी अवैध सावकारीसंदर्भात धाडसत्र राबविण्यात आले. विनापरवाना सावकारी करणा-यांविरुद्ध कार्यवाही करताना ताबेगहाण मालमत्ता ताब्यात घेण्यात आली. या मिळकतींबाबत संबंधितांनी दावा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या धाडसत्रामधील मनोहर अडितमल कृपलानी, दिनेश मनोहर कृपलानी (रा. पक्की खोली, सिंधी कॅम्प, अकोला) व संतोष श्रीराम अहिर (पायल बंगल्यामागे, संदेशनगर, वाशिम बायपास, ता. जि. अकोला) याठिकाणी कुणा संबंधित व्यक्तींची मालमत्ता कर्जाचे तारण म्हणून त्यास ताबेगहाण ठेवण्यात आली असल्यास संबंधित कर्जदार किंवा त्यांच्या वारसांनी लेखी दावा आवश्यक पुराव्यासह दाखल करावा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, 'सहकार संकूल' आदर्श कॉलनी, अकोला येथे दि. 29 डिसेंबर 2025रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपावेतो कार्यालयीन दिवशी मालमत्तेची, कागदपत्रांची पाहणी करावी व दि. 30 डिसेंबर 2025 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत मालमत्तेबाबत दावे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे