परभणी : 21 डिसेंबर रोजी मतमोजणी; परिसरात 163 कलम लागू
परभणी, 17 डिसेंबर (हिं.स.)। नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा मतदारसंघात 02 डिसेंबर रोजी मतदान झाले. मतमोजणी रविवार दि. 21 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हादं
परभणी : 21 डिसेंबर रोजी मतमोजणी; परिसरात 163 कलम लागू


परभणी, 17 डिसेंबर (हिं.स.)। नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा मतदारसंघात 02 डिसेंबर रोजी मतदान झाले. मतमोजणी रविवार दि. 21 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 लागू केले आहे.

परभणी जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी नगरपरिषद निहाय पुढील ठिकाणी होणार आहे. सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय, नवीन इमारत, गंगाखेड, श्री. गुरु नथ्थुराम म. केहाळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर, उपविभागीय अधिकारी कार्यालय, सेलू, तहसिल कार्यालय, मानवत, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोनपेठ रोड, पाथरी, तहसील कार्यालय, सोनपेठ, तहसील कार्यालय पूर्णा येथे 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून मजमोजणी होणार आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये मतमोजणीच्या केंद्राच्या ठिकाणापासून 100 मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालय, उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश प्रतिबंध करण्यात आला आहे. सदरील आदेश दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6.00 वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande