नव्या वर्षात सोलापुरात धावणार महापालिकेच्या ई-बस
सोलापूर, 17 डिसेंबर, (हिं.स.) सोलापूर महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ई- बस योजनेअंतर्गत १०० ई- बस मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यातील बसगाड्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने
smc


सोलापूर, 17 डिसेंबर, (हिं.स.) सोलापूर महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ई- बस योजनेअंतर्गत १०० ई- बस मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यातील बसगाड्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने बसच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनचे काम देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे.

सध्या महापालिकेच्या एकूण १८ बस धावत आहेत. त्यापैकी १२ बस ग्रामीण भागाशी जोडलेल्या आहेत, तर ६ बसेस सोलापूर शहरातून धावत आहेत. आता नव्या ई-बस कोणत्या मार्गावरून धावाव्यात यासाठी यापूर्वीच विविध मार्गांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील २४ मार्गावर ई- बसेस सोडण्यात येणार आहेत.त्यामध्ये मार्केट यार्ड- घरकूल ते शेटेवस्ती, राजेंद्र चौक ते प्रल्हाद नगर, राजेंद्र चौक ते साखर कारखाना, राजेंद्र चौक ते ज्ञानेश्वर नगर, राजेंद्र चौक ते खेडगाव, राजेंद्र चौक ते कमलानगर, रेल्वे स्थानक ते रे नगर, राजेंद्र चौक ते राजस्व नगर, राजेंद्र चौक ते सलगर वस्ती, राजेंद्र चौक ते संतोष नगर, राजेंद्र नगर ते प्रताप नगर, राजेंद्र चौक ते गोदूताई नगर, कन्ना चौक ते मार्केट यार्ड- घरकूल, कोंतम चौक ते चंद्रकला नगर, राजेंद्र चौक ते ज्ञानेश्वर नगर, रेल्वे स्थानक ते देसाई नगर, रेल्वे स्थानक ते मित्रनगर, राजेंद्र चौक ते सिध्देश्वर नगर, राजेंद्र चौक ते प्रताप नगर या मार्गांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande